कशेडी बोगद्यात दुतर्फा वाहतूक सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी गोंधळ
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा महाराष्ट्र दिनी बुधवारपासून दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाल्याने दोन्ही दिशांकडील प्रवास वेगवान अन आरामदायी झाला आहे. मात्र बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीस पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. बोगद्यातून अवजड वाहनेही मार्गस्थ होत असल्याने वादाचे प्रसंग उदभवत आहेत. यामुळे वाहतूक नियंत्रणात आणताना कशेडी येथील वाहतूक पोलीस मदत केंद्रातील पोलिसांची दमछाकच होत आहे.उन्हाळी सुट्टीचा हंगाम लग्नसराईसह लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या कशेडी बोगद्यातून दुतर्फा वाहतूक सुरू झाल्याने सार्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या नियोजनाअभावी वाहतूक व्यवस्थेचे पुरते तीन तेराच वाजल्याचे समोर आले आहे.www.konkantoday.com