रत्नागिरी नगरपरिषदेच्यावतीने आता कचरा संकलनासाठी क्यूआरकोड
रत्नागिरी शहरातील घनकचरा संकलनाची माहिती नगर परिषद प्रशासनाला मिळावी यासाठी कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी क्यूआरकोड स्कॅनिंग होणार आहे.शहरात २९ हजार निवासी आणि व्यापारी मालमत्ता असून त्यापैकी सुमारे ४ हजार मालमत्तांवर क्यूआरकोड चिकटविण्यात आले आहेत.रत्नागिरी शहरात प्रतीदिन २० ते २२ टन कचरा जमा होतो. या कचर्याच्या संकलनाची माहिती नगर परिषदेला मिळावी यासाठी क्यूआरकोड स्कॅनिंग प्रणाली राबविण्यात येत आहे. क्यूआरकोड सर्व मालमत्तांवर चिकटवण्यात आल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेत हे ऍप इस्टॉल केले जाणार आहे. ही प्रणाली कार्यरत झाल्यानंतर कचरा गोळा करणार्या घंटागाड्यांचे लोकेशनही कळणार आहे. www.konkantoday.com