कोकण रेल्वे मार्गावर धावणार अतिरिक्त विशेष गाडी
मडगाव, गोव्यात पर्यटनासाठी येणऱ्यांची गर्दी पाहून उन्हाळी हंगामात मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी अशी आणखी एक विशेष गाडी सुरू करण्यात येत आहे. यामुळे पर्यटकांची चांगली सोय होणार आहे.उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गाडी क्रमांक ०१०१७/०१०१८ लोकमान्य टिळक (टी) – थिवी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (त्रि-साप्ताहिक) गाडीचे नियोजन करण्यात आलेले आहे.गाडी क्र. ०१०१७ लोकमान्य टिळक (टी)- थिवी स्पेशल ट्राय-साप्ताहिक लोकमान्य टिळक (टी) येथून २६ एप्रिल ते ४ जून २०२४ या कालावधीपर्यंत दर शुक्रवार, रविवार आणि मंगळवारी २२.१५ वाजता सुटेल व ही गाडी दुसऱ्या दिवशी ९.५० वाजता थिवीला पोहोचेल.*सेवेचा लाभ घ्यावा**गाडी क्र. ०१०१८ थिवी- लोकमान्य टिळक (टी) विशेष*त्रि-साप्ताहिक थिवी येथून २७ एप्रिल ते ५ जून या कालावधीपर्यंत दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी १६.३५ वाजता सुटेल व ही गाडी दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ३.४५ वाजता पोहोचेल. ही १७ डब्यांची गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबेल.वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करावे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केलेले आहे.www.konkantoday.com