१६ वर्षीय मुलाचा शौचालयात मृत्यू
चिपळूण तालुक्यातील कोंढ्ये कुळयेवाडी येथील आर्यन महेंद्र कुळये (१६) याचा शौचालयात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आर्यन हा सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमाराला आपल्या घरामध्ये असलेल्या शौचालयात गेला होता. बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने त्याच्या वडिलांनी शौचालयात जावून त्याला हाका मारल्या परंतु त्याचा प्रतिसाद न मिळाल्याने शौचालय उघडून पाहिले असता आर्यन हा शौचालयात उपडी अवस्थेत दिसून आला. त्याला तातडीने चिपळूण येथील लाईफ केअर रूग्णालयात नेण्यात आले परंतु तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले.www.konkantoday.com