महावितरणच्या कोकण प्रादेशिकस्तरीय नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘डबल गेम’ प्रथम.
* महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत रत्नागिरी परिमंडलाच्या ‘डबल गेम’ या नाटकाने सांघिक नाट्यनिर्मिती प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात सहा पारितोषिके पटकाविली. ‘एकेक पान गळावया’ या प्रकाशगड (मुंबई) मुख्यालयाच्या नाटकास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेच्या सांगता सोहळ्यासाठी महावितरणचे संचालक (संचालन तथा मानव संसाधन) अरविंद भादीकर, मुख्य अभियंता परेश भागवत (कोकण परिमंडल), दीपक कुमठेकर (नाशिक), कैलास हुमणे (जळगाव), अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर, विनोद पाटील, नाट्य परिक्षक विश्वास पांगारकर, मंजुषा जोशी, प्रदीप तुंगारे उपस्थित होते. विजेत्या संघांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिके देवून गाैरविण्यात आले. वैयक्तिगत गटात अभिनय (पुरुष) प्रथम दुर्गेश जगताप (डबल गेम, रत्नागिरी), द्वितीय किशोरकुमार साठे (एकेक पान गळावया, प्रकाशगड, मुंबई), अभिनय (स्त्री) प्रथम रेणुका सुर्यवंशी (द ग्रेट एक्सचेंज, नाशिक), व्दितीय श्रद्धा मुळे (डबल गेम, रत्नागिरी), अभिनय उत्तेजनार्थ अलका कदम (एकेक पान गळावया, प्रकाशगड, मुंबई), मकरंद जोशी (द ग्रेट एक्सचेंज, नाशिक), युगंधरा ओहोळ (‘म्याडम’, जळगाव), दिपाली लोखंडे (ऑक्सिजन, कल्याण), डॉ. संदीप वंजारी (‘द रेन इन द डार्क’, भांडुप), अनुराधा गोखले (डबल गेम, रत्नागिरी) अभिनय बालकलाकार उत्तेजनार्थ संयुक्ता राऊत, समर्थ जाधव, पूर्वा जाधव, शुभांगी भोई (‘म्याडम’ , जळगाव ) दिग्दर्शन- प्रथम राजीव पुणेकर (डबल गेम, रत्नागिरी), द्वितीय विनोद गोसावी (एकेक पान गळावया, प्रकाशगड, मुंबई), नेपथ्य प्रथम राजेंद्र जाधव (डबल गेम, रत्नागिरी), द्वितीय संदेश गायकवाड (एकेक पान गळावया, प्रकाशगड, मुंबई), प्रकाशयोजना प्रथम अमोल जाधव (एकेक पान गळावया, प्रकशगड, मुंबई), द्वितीय डॉ. प्रदिप निंदेकर, योगेश मांढरे (‘द रेन इन द डार्क’, भांडुप), पार्श्वसंगीत प्रथम नितीन पळसुलेदेसाई, राजीव पुणेकर (डबल गेम, रत्नागिरी), द्वितीय देवेंद्र उंबरकर, अविनाश गोसावी (‘द रेन इन द डार्क, भांडुप), रंगभूषा व वेशभूषा प्रथम हेमंत पेखळे (द ग्रेट एक्सचेंज, नाशिक), द्वितीय रविंद्र चौधरी, सचिन भावसार (‘म्याडम’ , जळगाव ) यांना जाहीर झाली आहेत.www.konkantoday.com