
कोंकण रेल्वे वर भगवा फडकवणाऱ्या सैनिकांचा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी केला सन्मान….
कोंकण रेल्वे वर मान्यताप्राप्त युनियनच्या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रणित रेल कामगार सेना आणि कोंकण रेल्वे एम्प्लॉईज युनियन ह्या युतीचा विजय झाला. गेली १४ वर्ष कोंकण रेल्वे वर कम्युनिस्ट युनियन (NRMU) लालबावटा ह्यांची सत्ता होती. ती उलटवून कोंकण रेल्वे वर भगवा फडकला. त्यानंतर राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांची शिवसेना जिल्हा कार्यालय आठवडा बाजार रत्नागिरी येथे शिवसेना प्रणित रेल कामगार सेनाचे श्री. नंदकिशोर सावंत व एल. डी पवार ह्यांनी भेट घेतली त्यावेळी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा त्यांना दिल्या त्याप्रसंगी उदोजक दीपक साळवी, उप जिल्हाप्रमुख संजय साळवी, किरण साळवी उपस्थित होते.
www.konkantoday.vom