लांजा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य आणि पदाधिकार्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश.
* लांजा तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पडले असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य आणि पदाधिकार्यांनी बुधवारी 24 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे मंत्री रवींद्र चव्हाण तसेच भाजपचे नेते आणि महासचिव विनोद तावडे व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी स्वागत केले. भाजपाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मंगळवारी लांजा तालुक्याच्या दौर्यावर आले होते. या दौर्यात त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. बुधवारी 24 एप्रिल रोजी दुपारी रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाकेड ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी चंद्रकांत बाराम आणि स्नेहल पांचाळ तसेच वाघणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच रिद्धी रुपेश जवरे आणि उपसरपंच अरुण शांताराम जाधव त्याचबरोबर गवाणे ग्रामपंचायत सदस्य दीपक दाभोळकर, प्रशांत कोटकर राधिका डोंगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील दाभोळकर, युवासेना उपतालुका अधिकारी धर्मेंद्र दाभोळकर, महिला शाखा संघटक तन्वी दाभोळकर, गटप्रमुख विश्वनाथ शिंदे, शाखाप्रमुख विलास दाभोळकर यांच्यासह सुनील दाभोळकर अजय दाभोळकर, तानाजी दाभोळकर, रवींद्र दाभोळकर आदि पदाधिकार्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे नेते विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पक्षाची शाल घालून स्वागत केले. www.konkantoday.com