माजी आम.प्रमोद जठार याचा ५९ वा वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा सहसंयोजक,सिंधुरत्न समृध्दी समिती सदस्य तथा माजी आम.प्रमोद जठार याचा ५९ वा वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा कासार्डेतील निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, हितचिंतक यानी उपस्थित राहून श्री. जठार याना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. देशाच्या सीमेवर जे जवान काम करत आहेत.त्याच्या व आपल्या सर्वाच्या आयुष्यात असेच वाढदिवस यावेत व सुख समृद्धी येवून कोकणच्या विकासाची भरभराट होवूदे महाराजा ऐवढीच पार्थना करतो असे त्यानी वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्यात सांगितले. यावेळी अभीष्टचिंतन सोहळ्यास केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी- सिंधुदुर्गचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे याच्या प्रमुख उपस्थितीत प्रमोद जठार याच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पत्नी सौ. निरजा जठार,सौ निलम राणे,आम.नितेश राणे,अभिषेक जठार, आदित्य जठार,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, डाॅ.मिलिंद कुलकर्णी,कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल,भाजपा महिला प्रदेश सदस्या दिपलक्ष्मी पडते,प्रमोद जठार मित्रमंडळ अध्यक्ष प्रसाद जाधव, शिडवणे सरपंच रविंद्र शेटये,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत,मानसी वाळवे याच्यासह,प्रमोद जठार मित्रमंडळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील भाजपा पदाधिकाऱ्यांसह प्रमोद जठार प्रेमी उपस्थित होते.वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ना. राणे म्हणाले, प्रमोद जठार याचा आजचा शुभदिवस माझाही शुभदिवस आहे.प्रमोद जठार याना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य व त्याच्या मनातील मनोकामना पूर्ण करो अशी प्रार्थना मी माझ्या रामेश्वराकडे करतो. आजच्या वाढदिवसाबरोबर पुढील पंचाहत्तर व शंभराव्या वाढदिवसाला मला बोलवतील असे सांगत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमोद जठार मित्रमंडळाच्या वतीने प्रमोद जठार याच्या वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी सकाळपासूनच रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथिल भाजपा पदाधिकाऱ्यांसह सामाजिक, सांस्कृतिक, कला,क्रिडा, शैक्षणिक, पत्रकार व प्रमोद जठार प्रेमी यानी उपस्थित राहत पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त स्नेहभोजनाचा आस्वाद उपस्थितांनी घेत कलारंजन मुंबई निर्मित मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाने वेगळीच रंगत आणत उपस्थितांनी मने जिंकली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button