उत्तर रत्नागिरीतील मनसे कार्यकर्ते तटकरेंचा करणार प्रचार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर निर्णय

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर उत्तर रत्नागिरीतील पदाधिकार्‍यांच्या येथे झालेल्या बैठकीत संमिश्र भावना उमटल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर उत्तर रत्नागिरीतील पदाधिकार्‍यांची गुरूवारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षात कुणीही नाराज नसून राज ठाकरे यांच्या आदेशाबाहेर कोणीच जाणार नाही, असे मनसेचे नेते संजय देशपांडे यांनी स्पष्ट केले. यामुळे राज ठाकरे यांच्या भेटीनंतर रायगड लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा मनसेचे कार्यकर्ते प्रचार करतील हे स्पष्ट झाले आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेच्या उत्तर रत्नागिरीतील पदाधिकार्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ज्यांनी खोटे गुन्हे दाखल करून तुरूंगात डांबले, पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करून त्यांच्या व्यवसायावरही गदा आणली त्याच्यासमवेत जावून प्रचार करायचा तरी कसा? अशी खदखद मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत येथे झालेल्या बैठकीत उत्तर रत्नागिरीतील सर्वच पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर मनसे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी उत्तर रत्नागिरीतील पदाधिकार्‍यांना शिवतीर्थ निवासस्थानी भेटीसाठी बोलावले होते. त्यानुसार राज ठाकरे व उत्तर रत्नागिरीतील पदाधिकारी यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भूमिका स्पष्ट करताना स्थानिक पातळीवर धुसफूस ही प्रत्येक पक्षामध्ये असतेच त्यात वेगळे असे काहीच नाही. राज ठाकरे यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावनाही ऐकून घेतल्यानंतर त्यांना मार्गदर्शनही केले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button