
मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा तर कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या उशिरा
अद्यापही पाऊस सुरू न झाल्याने व सुट्ट्या असल्याने कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा ओढा वाढला आहे त्यामुळे अनेक पर्यटक कोकणात आल्यानंतर माघारी फिरत आहेतरत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक एकत्र सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे.राज्यासह कोकणात उन्हाचा पारा चढला असला तरी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अवकाळी पाऊस त्रास देत असल्यामुळे चाकरमानी आणि पर्यटक शहराकडे वळले आहेत. कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या रेल्वेची तिकीट मिळत नाहीत. काही रेल्वे उशिराने धावत आहेत. www.konkantoday.com