बांदा परिसरातील ‘तिलारी’च्या पोटकालव्यांना गळतीचे ग्रहण
सिंधुदुर्ग:- प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांची दुरुस्तीकामे करूनही बांदा परिसरातील ‘तिलारी’च्या पोटकालव्यांना गळतीचे ग्रहण थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. निकृष्ट कामामुळे कालव्याला ठिकठिकाणी गळती लागली असून दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे.ठेकेदारांच्या फायद्यासाठी निकृष्ट कामे होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी केला आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे श्री. खान यांनी सांगितले. प्रतिवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा ‘मलिदा’ ठेकेदार लाटत आहेत. तिलारी पोटकालव्याचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याने नेमके मुरतेय कुठे, याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. www.konkantoday.com