
खेड तालुक्यातील ऐतिहासिक सुमारगड किल्ला पुरातत्वकडून दुर्लक्षित
खेड तालुक्याच्या पर्वतरांगेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे ऐतिहासिक किल्ले डौलाने उभे आहेत. मात्र या तीन किल्ल्यांपैकी सुमारगड किल्ला अतिउंचावर व निसर्गरम्य परिसरात असून हा किल्ला पुरातत्व विभागाकडून दुर्लक्षित करण्यात आला आहे. सुमारगडच्या जतन व संवर्धन कामासाठी संयुक्तिक प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवभक्त रामचंद्र आखाडे यांनी शिवभक्तांनाा केले आहे.सुमारगड किल्ला अतिउंचावर असून गडावर ये-जा करण्यासाठी पायवाटांचा अभाव आहे. तुक्याती वाडीमालदे गावातील काही निष्ठावंत शिवभक्तांनी गडावर स्वच्छता मोहीम राबवत येण्या-जाण्याचा मार्ग सुकर केला आहे. काही अवजड ठिकाणी स्वखर्चाने लोखंडी शिडीची व्यवस्था केल्याने गडप्रेमींची पावले सुमारगडाकडे वळत आहेत. www.konkantoday.com