चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस येथे उद्यानाकडे जाणार्या रोडवरील गटारावरील स्लॅब खचले
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. चिपळूण शहरातही कामाची रखडपट्टी सुरूच आहे. अशातच निकृष्ट कामाचा एक दर्जेदार नमुना समोर आला आहे. चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस येथे पाग उद्यानाकडे जाणार्या रोडवरील गटारावरील स्लॅब दोन दिवसांपूर्वीच खचला होता. आता संबंधित विभागाने हे गटार पूर्णपणे खोदले आहे व पुन्हा नव्याने बांधण्याची तयारी सुरू केली आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड वारंवार केली जात आहे. अशातच अनेक वेळा रस्त्याला क्रॅक जाणे, रस्ता खचणे, मोर्या खचणे, गटारे खचणे, असे प्रकार घडत आहेत. www.konkantoday.com