भारतीय रेल्वेने १७१ गौरवशाली वर्षे पूर्ण केली.
आशियातील खंडातील पहिली ट्रेन चारशे प्रवासी घेऊन अवघ्या ५७ मिनिटात मुंबई ते ठाणे दरम्यान आजच्या दिवशी अर्थात १६ एप्रिल १८५३ रोजी धावली होती. या पहिल्या ट्रेनला मंगळवारी १७१ वर्ष पूर्ण झाले. मध्य रेल्वेकडून हा इतिहास जपण्यासाठी आजही सीएसएमटी-ठाणे लोकल ट्रेनचा वेळापत्रकात काही बदल केलेला नाही. दीडशे वर्षांपासून त्याच वेळापत्रकावर सीएसएमटी-ठाणे धीमी लोकल धावत आहे. त्यामुळे ठाणे लोकल आशिया खंडाच्या रेल्वे विकासाची साक्षीदार आहे.