
शब्द पाळला नसाल तर माझा मार्ग मोकळा, शौकत मुकादम यांचा इशारा
दिलेला शब्द पाळणार नसाल तर माझा मार्ग मला मोकळा आहे, असे लेखी पत्र अजितदादा पवार यांना चिपळूणचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी दिले आहे.गेली पस्तीस ते चाळीस वर्षे मी आपल्याबरोबर काम करीत आहे. या आधी मी दोनवेळा विधानसभेची उमेदवारी आपल्याकडे मागितली होती. ती आपण मला दिली नाहीत. आपण व खा. सुनील तटकरे यांनी भविष्यात आपला विचार करू, असे आश्वासन दिले होते. आपण दिलेल्या उमेदवारांचे निवडणुकीत मी प्रामाणिकपणे काम केले आहे. आता सध्याच्या विधान परिषदेसाठी अल्पसंख्यांक म्हणून मला उमेदवारी मिळावी, अशी मी इच्छा आपल्याकडे व्यक्त केली होती. प्रत्येक वेळी मला डावलले जात असेल, तर मला माझा मार्ग मोकळा आहे, असे माजी पंचायत समिती सभापती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते शौकतभाई मुकादम यांनी मंगळवारी मुंबई येथे देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांची भेट घेवून पत्र दिले.www.konkantoday.com