हे मोदींसमोर वळवळणारे मांडूळ आहेत,तीन महिने थांब, मग हे सरकारी जिल्हाधिकारी आणि मिंध्यांचे जिल्हाधिकारी कुठे पाठवतो ते बघा.-उद्धव ठाकरे


नुसत्या घोषणा देऊन निवडणुका नाही जिंकता येणार. जसं आता हे मिंधे सरकार करत आहे, घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ. आपल्याला नुसत्या घोषणा करून चालणार नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित शिवसेना ठाकरे गटाच्या भगव्या सप्ताहाच्या समोरप प्रसंगी भाषणाची सुरूवात केली.तसेच, भगव्या सप्ताहाचा आज समारोप होतो आहे. या भगव्या सप्ताहाचं कारण हे दुबार मतदार नोंदणी, आपले मतदार नोंदणी, यादी वाचण हे करण्यासाठीच होतं. असंही यावेळी सांगितलं.यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राजन विचारे तुम्ही जे बोललात ते फार महत्त्वाचं आहे. दुबार मतदार नोंदणी आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी काही केलं नाही. तीन महिने थांब, मग हे सरकारी जिल्हाधिकारी आणि मिंध्यांचे जिल्हाधिकारी कुठे पाठवतो ते बघा. यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूयात. ठाणं जे उभा राहिलं आहे, त्यामागे शिवसेना प्रमुखांचं प्रेम, ठाणेकरांचं शिवसेनाप्रमुखांवरील प्रेम आणि ठाणेकरांची, शिवसैनिकांची अपार मेहनत. ही मेहनत जर झालीच नसती तर मिंधेंची दाढी उगवलीच नसती.याचबरोबर ‘संजय राऊत तुम्ही नागाची उपमा दिली परंतु मी नागाचा अपमान करू इच्छित नाही. कारण हे तर दुतोंड्या मांडूळ आहेत. कारण, फणाला सुद्धा एक स्वाभिमान लागतो, हे तर सरपटणारे प्राणी आहेत. हे मोदींसमोर वळवळणारे मांडूळ आहेत. हे लबाडी करून हे जिंकलेले आहेत. ठाणेकरांचं मी कौतुक करायला आलेलो आहे. कारण, सगळं काही पळवलं. जोर जबरदस्ती, पैशांचं वाटप. एवढं करून सुद्धा सव्वा पाचलाख ठाणेकर आपल्यासोबत निष्ठेने आणि प्रेमाने उभा राहिले. आपल्याला सव्वाचार ते साडेचार लाख मतं कल्याणकरांनी दिली आहेत. आपल्या वैशाली राणेंच्या पराभवासाठी शिंदेच्या कारट्याला विश्वगुरुंना आणावं लागलं. हाच तर आपला विजय आहे.’तसेच ‘आपल्याला लबाडी करून काहीही नकोय, जे काय पाहिजे ते हक्काचं आणि प्रेमाचं पाहिजे. विकत भाज्या घेता येतात, आम्हाला मतं विकत नकोय. प्रचंड पैसा ओतून सुद्धा एवढी मतं मिळवली, तरी सुद्धा विजय समोर दिसत नाही म्हणून त्यांनी लबाडी केली. अमोल किर्तीकरांचा पराभव मुंबईत होऊच शकत नाही, ती त्यांनी चोरलेली सीट आहे.’ असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

याशिवाय, ‘यानंतर ज्या दोन निवडणुका झाल्या एक पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ संपूर्ण मुंबई त्यामध्ये मतदान करते. पदवीधर आणि शिक्षक, आजपर्यंत कधीही जेवढं मतदान झालं नाही तेवढं मतदान या निवडणुकीत झालं आणि प्रचंड मताधिक्क्याने आपल्या शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला उमेदवार त्यांनी निवडून दिला.’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button