
रत्नागिरी जिह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर ,काही घरे व गोठ्यांचे नुकसान
रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर आहे सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
चिपळूण तालुक्यात मौजे पिंपळी बुद्रुक येथील संदिप बावडेकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे खालाचा पिपंळी येथील कादिर सु मिरारवान यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीत हानी नाही.
गुहागर मौजे चिखली-पागरी येथील रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याचे काम चालू केले आहे. मौजे अंजनवेल-काजुर्ले रस्त्यावर काही ठिकाणी दरड कोसळल्याने गटारे बंद झाली आहेत. सदर ठिकाणी वाहतूक सुरळीत आहे.
संगमेश्वर तालुक्यात मौजे धामापूर येथील लक्ष्मण रोमाणे यांच्या गोठ्याचे पावसामुळे अंशत: ३२ हजार रुपये नुकसान झाले आहे. जिवीत हानी नाही. मौजे शिव धामापूर येथे रामदास चव्हाण यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे जिवीत हानी नाही.
राजापूर तालुक्यातील मौजे हरळ येथे विठोबा गंगाराम पांचाळ यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. जिवीत हानी नाही.
www.konkantoday.com