
रत्नागिरी नगरपालिका व कंत्राटदाराचा भोंगळ कारभार, विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ
रत्नागिरी नगरपालिकेच्या सुरु असलेल्या पाइपलाईनच्या कामासाठीशहरात विविध ठिकाणी चर खोदण्यात आले आहेत मात्र हे चर खोदल्यानंतर ते बुजवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याने त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर, बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस समोर असाच एक चराचा खड्डा पडलेला आहे. या ठिकाणी २ दिवसात किमान २० लहान-मोठे अपघात झाले आहेत व हाेतआहेत परंतु त्याकडे नगरपरिषद कोणतेही लक्ष देत नाही हे बुजविण्याचे जबाबदारी कोणाची आहे कंत्राटदाराची आहे की नगरपरिषदेची पण दोघेही आपली जबाबदारी स्वीकारत नसल्याने सामान्य लोकांचा जीव धोक्यात येत आहे विकासकामांच्या नावाखाली जनतेच्या जीवाशी खेळू नका असे नागरिकांचे म्हणणे आहे शहरातील असे खोदण्यात आले धोकादायक चर तातडीने बुजवण्यात यावेत अशी नागरिकांची मागणी आहे
www.konkantoday.com