महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा मेळावा होत असल्याने ते कोणती भूमिका घेणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील काही दिवसांपासून मनसे महायुती दाखल होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. भाजप आणि मनसे युतीच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अद्यापही याबाबत कोणतीही घोषणा नाही, त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरे कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
www.konkantoday.co.