भाजप उद्योग आघाडीच्या कोकण सहसंयोजक पदी भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय आयरे यांची निवड
भाजप उद्योग आघाडीच्या कोकण सहसंयोजक पदी लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र व भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय आयरे यांची निवड करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून सध्या रिंगणे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम पहात आहेत.सूक्ष्म, लघु, मध्यंम आणि मोठ्या उद्योगांकरिता, केंद्र आणि राज्यशासनाच्या सर्व योजनांचा फायदा मिळवून देवून आत्मनिर्भर भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना युवा वर्गामध्ये रुजवण्याकरिता आणि रोजगार वाढवण्याकरिता भाजप उद्योग आघाडी अग्रेसर असून, या आघाडीचे काम महाराष्ट्रामध्ये जोरदार चालू आहे.कोकण विभाग अध्यक्ष निमिष सावे यांनी कोकण दौरा करून, कोकणातील उद्योगांचा आणि तिथल्या उद्योजकांचा आढावा घेतला होता.या पार्श्वभूमीवर रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत, यांच्या माध्यमातून,भाजप उद्योग आघाडी, महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर आणि कोकण विभागध्यक्ष निमिष सावे यांनी भाजप उद्योग आघाडी च्या कोकण सहसंयोजक पदीसंजय चंद्रकांत आयरे यांची निवड जाहीर केली आहे.www.konkantoday.com