लोकसभेसाठी ज्येष्ठांनी आशीर्वाद द्यावेत रवींद्र चव्हाण
रत्नागिरी, ता. ६ : भाजपच्या ४५व्या वर्धापनदिनानिमित्त दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यालयात जनसंघ, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या ज्येष्ठ मंडळींनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद द्यावेत, मार्गदर्शन करावे, पक्ष वाढण्यासाठी मदत करावी. लोकसभा निवडणूक कमळाच्या निशाणीवर लढवली गेली पाहिजे, अशी आपल्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.दक्षिण रत्नागिरी भाजप कार्यालयात ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी माजी आमदार बाळ माने म्हणाले, ६ एप्रिल १९८० ला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवानी, मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपची स्थापना झाली. सूरज उगेगा कमल खिलेगा, असे वाजपेयी म्हणाले होते. आज भाजपाची घोडदौड सुरू आहे. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी कामकाजाचा आढावा घेतला. प्रशांत डिंगणकर यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर लोकसभा प्रमुख प्रमोद जठार, मंडल अध्यक्ष दादा दळी व विवेक सुर्वे, अॅड. भाऊ शेट्ये, अॅड. विलास पाटणे, सुजाता साळवी, महेंद्र मयेकर, राजन फाळके, सतेज नलावडे, सचिन वहाळकर, नंदू चव्हाण आदी उपस्थित होते.www.konkantoday.com