
आमच्या घरात काय चाललेय हे डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच्या खासदारकीचीच काळजी घ्यावी, रामदास कदम यांचा विनायक राऊत यांना टोला
उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आमच्या घरात काय चाललेय हे डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच्या खासदारकीचीच काळजी घ्यावी, असा टोला लगावत महायुतीत जागा वाटपाबाबत कुठलाही तिढा नाही, असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना तिकिट न मिळाल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन, असा मिश्किल टोलाही विरोधकांना लगावला.ते म्हणाले, दापोली मतदार संघातून आमदार योगेश कदम यांना संपविण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा खटाटोप सुरू असताना खासदार विनायक राऊत यांनी मध्यस्थी करत पहिल्याच टर्ममध्ये आमदार म्हणून निवडून आलेल्या योगेश कदमांना त्रास देण्यात काहीच अर्थ नाही, असे उद्धव ठाकरेंनी सूचित केले होते, याची जाणीव आहे. मात्र आजघडीला ते स्वतः दिल्लीत जाण्याची काळजी करण्यापेक्षा दुसर्याचीच काळजी करताना जनतेची दिशाभूल करण्याकरिता बेछूट आरोप करत आहेत हे त्यांच्या रजकीय अभ्यासू वृत्तीला अजिबात अनुसरून नसल्याचा टोला लगावला. www.konkantoday.com