रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून वंचितनेे मारूतीकाका जोशींना उमेदवारी देवून कुणबी समाजाला प्राधान्य दिले
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या मैदानात वंचित बहुजन विकास आघाडीने २०१९ नंतर पुन्हा एकदा शड्डू ठोकले आहेत. आघाडीकडून प्रबोधनकार तथा कुणबी समाजाचे मारूती उर्फ काका जोशी यांना उमेदवारी जाहीर करून रिंगणात उतरवले आहे. जोशी यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व मिळाल्याने येथील राजकीय वर्तुळात चुरस वाढणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी वंचितने ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीकडून कुणबी समाजाचे मारूती उर्फ काका जोशी रिंगणात उतरवून प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने कुणबी समाजाचे मतदार आहेत. ते विविध राजकीय पक्षांमध्ये विखुरलेले आहेत. कुणबी समाजाला जोशी यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व मिळणार असल्याने त्याचा फटका प्रमुख राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com