रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपचाच उमेदवार लढवेल. इथला उमेदवार पक्ष ठरवेल. कुणी लुडबुड करू नये-केंद्रीय मंत्री नारायण राणें
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार भाजपने अजूनही जाहीर केलेला नाही. या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना या मतदारसंघातून तिकीट देण्याचं घटत आहे.त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जातंय की काय? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच नारायण राणे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. माझ्या नेत्याने मला जे सांगितलंय ते गोपनीय आहे. आताच सांगणार नाही, असं म्हणत राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचा सस्पेन्स वाढवला आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत स्पष्ट विधान केलं. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपचाच उमेदवार लढवेल. इथला उमेदवार पक्ष ठरवेल. कुणी लुडबुड करू नये. मी तिकीट मागायला गेलो नाही. बातम्या देताना विचार करा. माझं नाव जाहीर झाल्यास मी निवडणूक लढवले आणि जिंकेल. कुणीही बैठक, मेळावा बोलवू देत, काही होत नाही. दहीकाला प्रमाणे बैठक होत राहतात, शंकासुर कोण असेल माहीत नाही. आम्ही मतदारसंघ सोडणार नाही. त्यांची (किरण सामंत) यांची माहिती घ्या, असं नारायण राणे म्हणाले.मला उमेदवारी मिळाली तर मी लढवले आणि जिंकेल. मला राजकारणात 56 वर्षे झाली आहेत. मला कुणी काहीही सांगितलेलं नाही. माझ्या पक्षाची ताकद मला माहीत आहे. मतदारसंघाचा माझा अभ्यास आहे. मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना सांगितलं की, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडणार. माझ्या नेत्यांनी मला काय सांगितलं ते गोपनीय आहे. आताच मी सांगणार नाही, असं राणे म्हणाले. तसेच उद्यापर्यंत रत्नागिरी- सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.www.konkantoday.com