कोकण रेल्वे मार्गावरील नागपूर स्पेशल एक्स्प्रेस गाडीने प्रवास करणार्या प्रवाशाचा मोबाईल चोरट्याने लांबविला
कोकण रेल्वे मार्गावरील नागपूर स्पेशल एक्स्प्रेस गाडीने प्रवास करणार्या प्रवासी महिलेचा मोबाईल चोरट्याने लांबवला. श्वेता संदीप मुळे (४१, रा. नागपूर) असे या महिलेचे नाव आहे.प्रवासादरम्यान चोरट्याने चार्जिंगला लावलेला मोबाईल लांबवला, अशी तक्रार श्वेता यांनी शहर पोलिसांत दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या माहितीनुसार २९ मार्च रोजी श्वेता नागपूर स्पेशल गाडीने गोवा ते नागपूर असा प्रवास करत होत्या. गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली असता चोरट्याने त्यांचा चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेला. अशी तक्रार श्वेता यांनी शहर पोलिसांत दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरूद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. www.konkantoday.com