आजही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम, किरण सामंत यांनी पोस्ट मागे घेतली- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याची फेसबुक पोस्ट ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी रात्री केली होती, मात्र आपण त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्वतः संपर्क साधला, त्यानंतर त्यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आली, अशी माहिती शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत दिली. इतकेच नाही तर आजही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम आहे, असे मोठे विधान उदय सामंत यांनी केले आहे. उदय सामंत यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.किरण सामंत हे माझे ज्येष्ठ बंधू आहेत, ते भावनिक आहेत, एकनाथ शिंदे यांची अडचण होऊ नये, म्हणून त्यांनी माघार घेण्याची पोस्ट केली होती, मात्र यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन तसेच मतदारांची भावना, जनभावना लक्षात घेऊन किरण सामंत यांच्याजवळ आपण बोललो आहोत. शिवसेनेकडून आमच्याकडून एकच इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे आजही आमचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा कायम असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com