
लोकसभा मिरवणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने गुन्हे दाखल असणार्यांची शस्त्रे होणार जमा
लोकसभा मिरवणुकीची आचारसंहिता सुरू झाली असल्याने जिल्ह्यातील परवानाधारक शस्त्र धारकाची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. त्यांचे वर्तन, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांची शस्त्रे जमा करण्याबाबत लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्यात ३ हजार ८८ शस्त्र परवानाधारक आहेत. त्या सर्व परवानाधारकांची पोलीस दलामार्फत माहिती घेतली जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली गेली आहे. या समितीमध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी हे सदस्य आहेत.जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांच्या बाबत त्यांचे वर्तन, दाखल असलेले गुन्हे या सर्व गोष्टींचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर त्यांची शस्त्रे जमा करण्याबाबत लवकरच कारवाई केली जाईल, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर करडी नरज ठेवली आहे.www.konkantoday.com