रत्नागिरी नगर परिषदेला झालय तरी काय ?गटाराचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी चक्क जयस्तंभ सर्कल परिसरात पसरले
रत्नागिरी शहरात मध्यंतरी मोठा गाजावाजा करीत गटाराचे काम घाऊक पद्धतीने करण्यात आले रस्त्यापेक्षा गटारांची असलेल्या ज्यादा उंचीमुळे त्यातून पाणी वाहून जाणार कसे असा सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न नगरपालिकेला पडला नाही त्यामुळे अशा पद्धतीचे गटारे शहरभर बांधण्यात आली जेल नाक्यापासून बांधण्यात आलेल्या नव्या गटारातील पाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गेट जवळ असलेल्या गटारामधून आज सकाळी चक्क रस्त्यावर नदीप्रमाणे वाहत आले आणि संपूर्ण जयस्तंभ सर्कल परिसरात दुर्गंधीयुक्त गटाराचे सांडपाणी पसरले त्यामुळे तेथून जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेवूनच जावे लागत होते सार्वजनिक बांधकाम खात्या जवळील बस स्टॉप जवळील गटारातून हे पाणी गटारे तुंबल्यामुळे बाहेर येत होते मात्र समोरच असलेल्या नगर परिषदेच्या प्रशासनाला त्याची कोणतीही जाणीव नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे सकाळच्या वेळेत हे गटारातून नेमके सांडपाणी कुठून येते याचा शोध नगरपरिषद घेणार आहे की नाही मुळात बांधण्यात आली गटारे एकमेकांना जोडण्यात आली नसल्यामुळे हे पाणी गटारातून सरळ रस्त्यावर बाहेर येत आहे जयस्तंभ परिसरा मधूनच जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख अधिकारी जात येत असतात रत्नागिरी नगर परिषदेचे कार्यालय समोरच आहे असे असताना हा सांडपाणी रस्त्यावर वाहून परिसरात पसरण्याचा संताप जनक प्रकार सतत घडत आहे यावर नगरपरिषद प्रशासन उपायोजना करणार आहेत की नागरिकांनी सकाळी या परिसरातून नाकावर रुमाल ठेवून जात राहायचे का हा प्रश्न आहेwww.konkantoday.com