
कुवारबाव येथे बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरा जवळील कुवारबाव रस्त्यावर निष्काळजीपणे खासगी प्रवासी बस चालवून पादचार्याच्या दुखापतीस व त्याच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंगाप्पा माणीक बंदीछोडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खासगी प्रवासी बस चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २५) रात्री साडेआठच्या सुमारास कुवारबाव येथील सिंचन भवन समोरील रस्त्यावर घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री लिंगाप्पा वाहन बस बॅच व गणवेश परिधान करता खासगी प्रवासी बस (क्र एमएच ४७ – एएस- ३४६५) घेऊन भरधाव वेगाने रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गावरुन जात होता. त्याच सुमारास सिंचन भवनसमोर कमलेशकुमार बारातीलाल चौहान (वय २५, रा. उत्तरप्रदेश ,सध्या रा. गयाळवाडी-खेडशी, रत्नागिरी) हा पादचारी रस्ता ओलांडत असताना त्याला खासगी बसची धडक झाली. या अपघातात कमलेशकुमारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झालाwww.konkantoday.com