संगमेश्वर तालुक्यातील आरवली गुरववाडी येथे तरुण विवाहितेची आत्महत्या
संगमेश्वर तालुक्यातील आरवली गुरववाडी येथील तरुण विवाहिता माया श्रीधर चौगुले (२४) हिने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.माया हिचे पती श्रीधर चौगुले हे जॅकवेलच्या कामानिमित्त बाहेर जात असतात. २२ मार्च रोजी ते कामावर गेले होते. घरात येऊन त्यांनी पाहिले असता दोन्ही दरवाजे बंद होते. त्यांनी पत्नी माया हिला हाक मारली, मात्र प्रतिसाद आला नाही. त्यामुळे घराचा दरवाजा उघडून त्यांनी घरात प्रवेश केला असता माया हिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन . आत्महत्या केली होती. माया हिने आत्महत्या का केली, हे अद्यापही समजले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी व संगमेश्वर ठाणे पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली.www.konkantoday.com