भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात ठाकरे यांना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमधून काँग्रेसचे एकूण ४६ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा समावेश असून, पहिल्या टप्पात मतदान होणाऱ्या नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.काँग्रेसने महाराष्ट्रामधील नागपूर, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये नागपूरमधून आमदार विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे. तर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून डॉ. प्रशांत पाडोले यांना तर रामटेकमधून रश्मी बर्वे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button