रत्नागिरी येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी गार्गी बंडबे ही विद्यार्थिनी भारतात चौथी
पोद्दार कॉन्टेस्टतर्फे २०२४ मध्ये कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल आज आयोजकांनी जाहीर केला आहे. रत्नागिरी येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी गार्गी बंडबे ही नववी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी भारतात चौथी आली आहे.या स्पर्धेसाठी पूर्ण भारतातून सुमारे ३०० कवी विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला होता. गार्गीच्या या यशाबद्दल रत्नागिरी आणि दापोली परिसरातून कौतुक होत आहे.www.konkantoday.com