
भाजपाच्या राजापूर पश्चिम तालुकाध्यक्ष पदी मोहन घुमे तर पुर्व तालुकाध्यक्षपदी ॲड एकनाथ मोंडे यांची निवड.
राजापूर / – भाजपचे महाराष्ट्रात संघटन बांधणीला मंडळ नियुक्तीद्वारे नवे बळ देण्यासं सुरुवात केली आहे. राज्यभरात ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता १९ मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राजापूर तालुका पश्चिम विभाग अध्यक्ष पदी मोहन घुमे तर पूर्व विभाग अध्यक्ष पदी ॲड. एकनाथ मोंडे यांची निवड करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर लक्ष ठेवून या नियुक्त्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. राजापूर तालुक्याचा विचार करता तालुक्याला तरुण तडफदार व सर्व पक्षांच्या तालुकाध्यक्षांमध्ये वयाने सर्वात लहान पण बुध्दिने महान असे मोहन घुमे व पुर्व विभागात नावाजलेले प्रसिध्द विधिज्ञ ॲड . एकनाथ मोंडे या दोघांच्या रुपाने तालुक्याला चांगले नेतृत्व मिळाल्याने पक्षवाढीला बळ मिळणार असून यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे.
दरम्यान राजापूर भाजप तालुका कार्यालयात रविवार दि.२० रोजी सायंकाळी उशीरा भाजपच्या निरिक्षकांच्यावतीने श्री घुमे व श्री मोंडे यांच्या नावाची पश्चिम व पुर्व विभाग तालुका अध्यक्ष पदासाठी निवडीची घोषणा करण्यात आली आहे.अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर दोघांनी ही छत्रपति शिवाजी महाराज व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव,महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ.सुयोगा जठार,महिला शहर अध्यक्ष सौ. स्नेहा रहाटे,कार्यालय प्रमुख संदेश विचारे,संदिप तेरवणकर,सौ.श्रृती ताम्हणकर अॅड.सुशांत पवार,नागेश शेट्ये,शीतल रहाटे,प्रल्हाद तावडे,प्रतिक निकम,सौ.सोनल केळकर,अमर वारीशे आदि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.