निवडणूक रोख्यातून शिवसेनेलाही कोट्यावधीचा निधी; शिवसेनेची संबंधित ‘या’ कंपनीने दिली देणगी!
गेल्या काही दिवसांपासून निवडणूक रोख्यांचा विषय प्रचंड चर्चेत आहे. कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला कितीचं दान दिलं यावरून खलबतं सुरू आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने आता सर्व माहिती निवडणूक आयोगाला दिली असून निवडणूक आयोगाने ही माहिती त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यानुसार, भारतीय जनता पक्षाला या निवडणूक रोख्यांचा सर्वाधिक फायदा झालाय. तर, अनेक राज्यातील स्थानिक पक्षांनीही निवडणूक रोख्यातून निधी वटवला आहे. शिवसेनेलाही या रोख्यातून निधी मिळाला आहे.नवी मुंबईतील धिरूभाई अंबानी कॉलेज सिटी येथील क्विक सप्लाय चेन प्रा.लिमिडेट कंपनीने भाजपा आणि शिवसेनेला निधी दिला आहे. रियालन्स समूहाशी संबंधित असलेल्या या कंपनीने ३८५ कोटी भाजपाला आणि २५ कोटी शिवसेनेला दिले आहेत. निवडणूक आयोगाने गुरुवारी सादर केलेल्या अहवालात ही आकडेवारी आहे.निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत क्विक सप्लाय चेन ही कंपनी तिसऱ्या क्रमांकाची ठरली आहे. २०२१-२३ आणि २०२३-२४ या काळात या कंपनीने ४१० कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले होते. यापैकी ३९५ कोटी भाजपाला आणि २०२२ मध्ये शिवसेनेला २५ कोटी दिले होते. गोदामे आणि स्टोरेज युनिट्स असलेल्या या कंपनीने भाजपा आणि शिवसेना व्यतिरिक्त इतर कोणत्याही राजकीय पक्षांना निधी दिलेला नाही.www.konkantoday.com