यंदा आंबा हंगाम लांबणार**कलमांना नव्याने फूट
_सध्या पावस परिसरामध्ये हापूस आंब्याचे उत्पादन चांगल्याप्रकारे असल्यामुळे बाजारात दरही चांगला मिळत आहे.उन्हामुळे झाडावरील आंबा काढण्यासाठी तयार होत आहे. तो काढण्यासाठी बागायतदार सरसावत आहेत. आवक वाढल्यास बागायतदारांपुढे दर घसरण्याची भिती आहे. बदलत्या हवामानामुळे झाडांना नव्याने फूट होत असल्यामुळे यंदाचा आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरातील वातावरण हापूस आंब्यासाठी पोषक आहे. आंबा उत्पादक दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग ते करत असतात. किटकांपासून आंब्याचे संरक्षण करण्यासाठी बागेत फवारण्याही केल्या जातात. लवकरात लवकर उत्पादन हाती आले तर बाजारात दर चांगला मिळतो. त्यादृष्टीने आंबा बागातदारांचे नियोजन असते. सध्या या भागांमध्ये हापूस आंबा मोठ्याप्रमाणात बाजारात पाठवला जात असल्यामुळे दरही समाधानकारक आहे.www.konkantoday.com