खेर्डी देऊळवाडी रेल्वे बोगद्यामध्ये तरूणाचा मृतदेह आढळला
कोकण रेल्वे ट्रॅकवर खेर्डी देऊळवाडी जवळील रेल्वे बोगद्यामध्ये १३५/५-६ किलोमीटर दरम्याने रविवार दि. १७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास एक तरूण मृतावस्थेत आढळून आला. यातील मयत हे रेल्वे बोगद्यामध्ये काम करीत असताना बोगद्यामध्ये शौचासाठी गेले असता त्या ठिकाणी सिद्धेश संतोष बोथरे (२८, रा. खोंडे, मधलीवाडी, ता. खेड) बेशुद्धावस्थेत खबर देणार यांना मिळून आले. त्यांनी व इतर कर्मचार्यांनी उपचारांकरिता उपरांत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून बोथरे याला मयत घोषित केले. www.konkantoday.com