
पोलीस भरती प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाहनांना पोलीस अधीक्षक कॉर्नर साई चौक 500 मीटर अंतरामध्ये प्रवेश बंद
रत्नागिरी, दि. 20 (जिमाका) : जिल्हा पोलीस भरती 2022-23 ची भरती प्रक्रिया 19 जून 2024 पासून सुरु झाली आहे. पोलीस भरती प्रक्रिया दरम्याने भरती प्रक्रिया परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून, यावेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतो अगर वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 115 अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी यांनी वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता 19 जून 2024 रोजी पासून ते संपूर्ण भरती प्रक्रिया संपेपर्यंत रोज सकाळी 06.00 वाजल्यापासून ते त्याच दिवशीची भरती प्रक्रिया संपेपर्यंत सर्व वाहनांना जेल नाका पुढील पोलीस अधीक्षक कॉर्नर ते मुख्यालय पुढील गवळीवाड्याकडे जाणारा रोड साई चौक असे 500 मीटर अंतरामध्ये प्रवेश बंद करण्याबाबत आदेशित केले आहे. तसेच पर्यायी मार्ग म्हणून 1) जेल नाका ते पोलीस अधीक्षक कॉर्नर मच्छीमार्केट रोड, 2) धनजी नाका-गवळीवाडा रोड- टीसीएम हायस्कूल ते माळनाका या पर्यायी मार्गाने वाहतुक वळविणेत येत आहे. असे अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी आदेशित केले आहे.