दादर येथील स्मशानभूमीमध्येच दानशूर भागोजीशेठ कीर यांचे स्मारक उभारणार -ना. केसरकर
दानशूर भागोजीशेठ कीर यांनी मुंबईच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलला. त्यांनी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीसाठी दान केलेल्या नऊ एकराच्या जागेतच त्यांचे स्मारक उभारणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यासाठी येत्या दिवसात दहा कोटींना मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील सावरकर स्मारकात दानशूर भागोजीशेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण ना. केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर खा. राहुल शेवाळे, सुप्रसिद्ध लेखक प्रा. ढवळे, अखिल भारतीय भंडार समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, सावरकरांचे नातू रणजित सावरकर, भागोजीशेठ कीर यांचे नातू अंकूर कीर, सावरकर राष्ट्रीय प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंजिरी मराठे, अविनाश महाराज आदी उपस्थित होते. www.konkantoday.com