समाजात वृद्धाश्रमांची गरज निर्माण झाली आहे- वीणा लेले
_रत्नागिरी : समाजाला आरोग्य यंत्रणेतील नर्सेसची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. लहान मूल आजारी पडले तर आई-वडिल काळजी घेतात. परंतु वृद्धांची काळजी घेण्याची इच्छा असूनही वेळ देता येत नाही. त्यामुळे शिरगावात वृद्धाश्रम सुरू केला व आता केळ्ये येथे १६० व्यक्तींकरिता वृद्धाश्रम सुरू होणार आहे, असे प्रतिपादन स्वगृही वृद्धाश्रमाच्या संस्थापिका वीणा लेले यांनी केले.जागतिक महिला दिनानिमित्त दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग, अधिवक्ता परिषद (कोकण प्रांत) रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिन समारोहाप्रसंगी त्या बोलत होत्या. जे. के. फाईल्स येथील रॉयल हॉलमध्ये कार्यक्रम रंगला. जिल्हा रुग्णालयात एएनएम, जीएनएम सुरू करण्यासाठी माजी आमदार बाळ माने यांनी मेहनत घेतल्याचे सांगितले. नर्सिंगमध्ये अद्ययावत शिक्षण घेतले पाहिजे. कोकणला नर्सिंगची चांगला वारसा आहे. बाळ माने यांच्या यश फाउंडेशनमध्ये नर्सिंग कॉलेज चांगल्या प्रकारे सुरू असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. भाऊ शेट्ये, अॅड. रत्नदीप चाचले, अधिवक्ता परिषद कोकण प्रांताच्या अॅड. प्रिया लोवलेकर, यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या रजिस्ट्रार शलाका लाड, सीईओ मानसी मुळ्ये, प्रा. चेतन अंबुपे, अधिवक्ता परिषदेच्या जिल्हा कार्यालयीन मंत्री तथा बार असोसिएशन सचिव अॅड. रत्नदीप चाचले व्यासपीठावर उपस्थित होत्या. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात स्कीट आणि कर्तुर्त्ववान महिलांच्या वेशभूषा सादर केल्या. यामध्ये राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहल्याबाई होळकर, फ्लॉरेन्स नाइंटिगेल, कल्पना चावला, किरण बेदी आदींसह महिलांचा समावेश होता.रत्नागिरी बार असोसिएशनच्या महिला प्रतिनिधी आणि अधिवक्ता परिषदेच्या जिल्हा मंत्री मीरा देसाई यांनी अधिवक्ता परिषदेची माहिती दिली. या कार्यक्रमाला तालुका सचिव तथा बार असोसिएशनचे खजिनदार अॅड. अवधूत कळंबटे, कार्यक्रमाला अॅड. ऋषी कवितके, श्रीकांत पेडणेकर, उज्ज्वला जोशी, गौरी देसाई, राहुल कदम, जान्हवी पवार, निखिल जैन आदी उपस्थित होते.www.konkantoday.com