रत्नागिरीत मच्छीमार दालदी महिला संघटना

रत्नागिरी -मिरकरवाडा जेटीवरील तसेच परिसरातील घरोघरी जाऊन मच्छी विक्री करणाऱ्या महिला एकत्र आल्या आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायातील समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासन श्रमिक संघ अधिनियमानुसार मच्छीमार दालदी मुस्लिम महिला संघटनेची नोंदणी केली आहे, असे अध्यक्ष हनिफा मजगावकर यांनी सांगितले. मिरकरवाडा येथील नुरूद्दीन पटेल, इम्तियाज मुकादम, शमिका दर्वे, सोसायटी अध्यक्ष इमरान मुकादम, नगरसेवक साखरकर, यासिन मजगावकर, उपाध्यक्ष अजिम होडेकर, बिलाल सोलकर यांच्या उपस्थितीत संघटना नोंदणीपत्र स्वीकारण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा हनिफा मजगावकर, उपाध्यक्ष शबाना मुकादम, चिटणीस बेगम मिरकर, सरचिटणीस अलसफा मुकादम, खजिनदार बानू सोलकर, उपखजिनदार जुमाबी शेख, सदस्य आरिफा साखरकर, अलमिन मुकादम, नसिमा वस्ता, हसिना सोलकर, रिजवाना वस्ता, हाफिजा मुकादम या पदाधिकारी उपस्थित होत्या.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button