
श्रीदेव मार्लेश्वर यात्रोत्सवही रद्द
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने श्रीदेव मार्लेश्वर-गिरीजादेवीचा विवाह सोहळा (कल्याणविधी) आज १४ जानेवारीला दुपारी १.२५ वाजता देवस्थानचे मानकरी, पूजारी अशा केवळ ५० जणांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिलेल्या नवीन आदेशानुसार मार्लेश्वर देवस्थानचे सर्व मानकरी यांची बैठक देवरूख पोलीस स्थानकात घेवून फक्त धार्मिक विधींना परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाविषयक सर्व नियम पाळून सोहोळा आयोजित करण्यावर उपस्थितांचे एकमत झाले. www.konkantoday.com