
नशीब बलवत्तर म्हणून कारमधील दाम्पत्य भीषण अपघातात बचावले
मुंबई गोवा महामार्गावर पालीनजीक चरवेली येथे आयशर टेम्पो कारच्या टपावरून जाऊन पलिकडे आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील दाम्पत्याचे नशिब बलवत्तर असल्याने बचावले आहेत. रत्नागिरीमधील राहणारे नितीन पंदेरे व सौ नीलम पंदेरे हे आपल्या कारने रत्नागिरीकडे येत असता गोव्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोची त्यांच्या कारबरोबर धडक झाली.ही धडक एवढी भीषण होती की आयशर टेम्पो कारच्या टप्पाला घासत कारच्या पलीकडे जाऊन आदळला यामुळे कारचा टप सपाट झाला.भीषण अपघातातून पंदेरे दाम्पत्य मात्र सुखरूपरित्या बचावले.ते जखमी झाले आहेत.
www.konkantoday.com