
जेसीबी संघटना आक्रमक, चिपळुणात जेसीबी, ब्रेकरचे दर दोनशे रुपयांनी वाढले.
चिपळूण तालुका जेसीबी संघटनेने जानेवारीपासून ताशी २०० रुपये बकेट दरवाढीचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला. त्यामुळे यापुढे जेसीबीचा दर १२०० रुपये तर ब्रेकरचा दर ताशी १४०० रुपये आकारण्याच्या सूचना सर्व व्यावसायिकांना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर यापुढे तालुक्यात फक्त जिल्हा आरटीओ पासिंग असलेले जेसीबी व्यवसाय करतील. त्यामुळे कर्नाटकमधून आलेल्यांनी आपले जेसीबी घेवून चिपळूण सोडावे असा इशाराही दिला गेला आहे.
बहाद्दूरशेख नाका येथील नलावडे यांच्या कार्यालयात चिपळूण तालुका जेसीबी संघटनेची बैठक पार पडली. त्यामध्ये काही प्रमुख गोष्टी करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने चिपळूण तालुक्यातील स्थानिक रहिवासी असलेले जेसीबी मालक यांचेच जेसीबी यापुढे तालुक्यामध्ये चालतील, तसेच बाहेरून म्हणजेच कर्नाटक व इतर राज्यातील पासिंग असलेले जेसीबी चिपळूण तालुक्यामध्ये यापुढे चालू द्यायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला.www.konkantoday.com