गुहागर विधानसभा मतदार संघात शिवसेनेने मला उमेदवारी देवून बळीचा बकरा केला -रामदास कदम
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदार संघात शिवसेनेने मला उमेदवारी देवून बळीचा बकरा केला आणि माजी खासदार अनंत गीते यांनी मला गुहागरातून पाडले, असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते (शिंदे गट) रामदास कदम यांनी केला.गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे गुहागर तालुका शिंदे गटाचा जाहीर मेळावा झाला. यावेळी प्रवक्त्या ज्योती वाघमागे, माजी खासदार सुनील तटकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित गटाचे बाबाजी जाधव, सुरेश सावंत, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्यासह खेडचे शिवसेनेचे पदाधिकारी, गुहागर तालुकाध्यक्ष बाबू गनगुटकर, उपतालुकाप्रमुख प्रभाकर शिर्के, शहरप्रमुख निलेश मोरे, संघटक प्रल्हाद विचारे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गुहागरमध्ये माझा पराभव झाला तो केवळ अनंत गीते यांच्यामुळे. आबलोली गावात तेथील मतदारांना मला मते देवू नये, असे गीते यांनी सांगितले होते. यानंतर मी स्वतः खात्री करण्यासाठी त्या मतदारसंघाकडून गीते यांना फोन करायला सांगितला. त्यावेळी गीते यांनी रामदास कदम यांना मते टाकू नका, असे सांगितल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. तसेच बाळासाहेबांनी डॉ. विनय नातू यांना फोन करून सेनेच्या कोट्यातून विधानपरिषद देण्याचे कबूल केले होते. मात्र, नातू यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे येथे माझा पराभव झाला आणि भास्कर जाधव यांच्यासारख्यांचे येथे फावले, अशी टीका रामदास कदम यांनी केली. www.konkantoday.com