मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांचा ११ रोजी चतुरंगी कृतज्ञता गौरव सोहोळा
चिपळूण नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांचा चतुरंगी कृतज्ञता सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सोमवार दि. ११ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा कृतज्ञता सोहोळा होणार आहे.हा सोहोळा चतुरंगद्वारे आयोजित होत असला तरी तो समस्त चिपळूणकर नागरिकांच्यावतीने कौटुंबिक स्वरूपात आयोजित केला जात आहे. श्री. शिंगटे यांनी केलेल्या कामांचा, विभागांचा लक्षवेधी आढवा धनंजय चितळे, भाऊ काटदरे, शशिकांत मोदी, मंदार ओक, प्रशांत पटवर्धन, अनंत मोरे हे घेणार आहेत. यावेळी दै. लोकसभाचे माजी (निवासी) संपादक सुधीर जोगळेकर यांनी शब्दांकीत केलेले सन्मानपत्र प्रसाद शिंगटे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या सोहोळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते सुनिल बर्वे उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन सौ. मीरा पोतदार आणि सौ. सोनाली खर्चे करणार आहेत. www.konkantoday.com