खेर्डी हत्तीमाळावर डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करावी -शौकतभाई मुकादम
चिपळूण शहरालगत असलेल्या खेर्डी औद्योगिक वसाहतीतील खोतीविरोधी चळवळीचे ठिकाण असलेल्या हत्तीमाळावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी एमआयडीसीने २५ गुंठे जागा समाज कल्याण विभागाकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.खेर्डी येथे आता औद्योगिक वसाहत आहे. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती विरूद्ध रणशिंग फुंकले होते. येथे त्यांनी ऐतिहासिक सभा घेवून खोती रद्द झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक चळवळी स्मृती कायम राहावी व हा ऐतिहासिक ठेवा जपला जावा. तो देशासमोर व जगासमोर येवून तरूण पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्यदिव्य स्मारक व वाचनालय व्हावे. यासाठी आपण सभापती असताना २००७ साली पंचायत समितीच्या सभागृहात स्मारकासाठी एकमुखी ठराव केला होता. त्यासाठी एमआयडीसीने २५ गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी अशी आपण मागणी केली होती. www.konkantoday.com