
काँग्रेस व उबाठाची युती ही अनैसर्गिक – काँग्रेस आमदार झिशान सिद्दकी
काँग्रेस आमदार झिशान सिद्दकी यांनी उबाठावर तोफ डागली आहे. उबाठाने मविआ सरकारच्या काळात माझ्यावर अन्याय केला. उबाठाने माझा फंड अडवून धरला म्हणून मी विकास कामं करू शकलो नाही .माझ्यावर अन्याय होत होता, पण हायकमांड मला गप्प रहायला सांगायचे.उबाठाचे नेते हे बिल्डर लोकांची दलाली करतात. काँग्रेस व उबाठाची युती ही अनैसर्गिक आहे. ती आज असेल तर उद्या नसेल, अशी टीका त्यांनी केली आहे.असं होत असेल तर ही कार्यकर्त्यांची हार आहे. पक्षाच्या बैठकीला दुसरा कोणता नेता येतो तर ते चुकीचं आहे. मी काँग्रेसचा सिटिंग आमदार आहे. काँग्रेसने ही हिंमत ठेवावी की आमचा तिकडे उमेदवार आहे.त्यांनी सांगाव की ही आमची जागा आहे. पण मित्र पक्षाला खुश करण्यासाठी काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांना संपवत चालली आहे आणि हे दुर्भाग्य पूर्ण आहे, असं देखील सिद्दकी म्हणालेमला जरी उमेदवारी नाही मिळाली तरी मी निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसने तिकीट दिलं नाही दिली तरी मी निवडणूक लढवणार आहे. जनता माझ्यासोबत आहे. कोणत्या पक्षासोबत जाऊन लढायचं ही मी जनतेत जाऊन ठरवणार.२०१९ ला मी उबाठाच्या उमेदवाराला हरवलं होत. तेव्हा जनता माझ्या सोबत होती. ठाकरे गटाने कोणताही विकास केला नाही. मी विकासकामं केली. ऊबाठाचे काही नेते पूर्ण वेळ बिल्डरसोबत असतात, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.