विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका याची समज महाराष्ट्रातील नेत्यांना द्यावी- रामदास कदम यांचा परत भाजपला इशारा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमध्ये जागा वाटपावरून रणकंदन सुरू असतानाच वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती विश्वास ठेवून भाजपासोबत आला आहोत. त्यामुळे विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका याची समज महाराष्ट्रातील नेत्यांना द्यावी असं सांगत माझेही नाव रामदास कदम आहे, लक्षात ठेवा असा सज्जड इशाराच त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना सुनावतानाच त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा ४०० पेक्षाही अधिक जागा घेऊन पंतप्रधान होतील यामध्ये अवघ्या देशात कोणाच्याही मनात शंका नाही असे सांगितले. रामदास कदम यांनी यावेळी केंद्र शासनाचे कौतुकही केलं. शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा राष्ट्रवादीचे अजितदादा पवार असतील, आम्ही नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या वर आणि त्यांच्या कामावर विश्वास ठेवून बरोबर आलो आहे. आमचा कुठेही विश्वासघात होणार नाही याचीही दक्षता त्यांनी घेणं आवश्यक असल्याचं रोखठोक विधान रामदास कदम यांनी केल आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button