शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यात ९८६ पदे रिक्त राहणार
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे २ हजार शिक्षकांची रिक्त पदे असतानाही पवित्र पोर्टलद्वारे १ हजार ६८ शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. त्यातही ५४ उमेदवार अनुपस्थित राहल्याने आता केवळ १ हजार १४ शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.त्यामुळे शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यात ९८६ पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे उर्वरित शिक्षकांची रिक्त पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.www.konkantoday.com