व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशीच इंधन कंपन्यांचा मोठा झटका दिला आहे. पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आलीये. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे.व्यावसायिक गॅस सिलिंडर दिल्लीत २५.५० रुपयांनी तर मुंबईत २६ रुपयांनी महागलाय. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करून जोरदार झटका दिलाय. तर १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात म्हणजे १ फेब्रुवारी रोजी सिलिंडरच्या किंमतीत १४ रुपयांनी वाढ झाली होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button